Wednesday, July 17, 2019

दिनविशेष

📱 *आम्ही तंत्रस्नेही*
*शिक्षक (जिल्हानिहाय) समूह* प्रस्तुत

📚  *शालेय परिपाठ* 📚

💠  *हिंदी  परिपाठ*

🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

🗓  💠 *वार*

💠 *दिनांक*
         *गुरुवार**                  *१८/७/२०१९*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

🇮🇳  *राष्ट्रगीत - जन गण मन*    🇮🇳

🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

🇮🇳  *प्रतिज्ञा-भारत मेरा देश है|*🇮🇳
   
           *प्रतिज्ञा* 

*भारत मेरा देश है।*

*सब भारतवासी मेरे भाई-बहन हैँ।*

*मैँ अपने देश से प्रेम करता हूँ*।

*इसकी समृद्ध एवं विविध* *संस्कृति पर मुझे गर्व है।*

*मैँ सदा इसका सुयोग्य* *अधिकारी बनने का प्रयत्न करता रहूगाँ।*

*मैँ अपने माता-पिता, शिक्षकोँ एवं गुरुजनोँ का सम्मान करुगाँ और प्रत्येक*
*के साथ विनीत रहूगाँ*।

*मैँ अपने देश और देशवासियोँ के प्रति सत्यनिष्ठा की प्रतिज्ञा करता हूँ।*

*इनके कल्याण एवं समृद्धि मेँ ही मेरा सुख निहित हैं !*

*संकलन --  सुनिता अनभुले, मुंबई*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
🇮🇳 *संविधान* 🇮🇳
*हम भारत के लोग*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
➿➿➿➿➿➿➿➿➿➿
🔔 *प्रार्थना*  🔔

*हे भगवान*
हे भगवा$$$$$न तुझे प्रणाम-२

तेरे बच्चे हम हो सच्चे-२
पढे-लिखेंगे योग्य बनेंगे
करम करेंगे नहीं डरेंगे
हे  भगवा$$$$$$$न तुझे प्रणाम
नित्य बढेंगे,बढते चलेंगे-२
दो वरदा $$$$$$$न
हे भगवा$$$$$$$न-२तुझे प्रणाम$$$$

या अल्लाह,या रहेमान-२
तुम हो हम पर महेरबान$$$$
पढ लिखेंगे करम करेंगे,नहीं डरेंगे
हे भगवान तुझे प्रणाम$$$$$
या अल्ला या रहेमान$$$$-२
तेरे बच्चे हम हो सच्चे.........।।

**संकलनःसौ.अलका आ.धनकर,वाशिम*
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
➿➿➿➿➿➿➿➿➿➿

💠 *दिनविशेष* 💠

॥ १८ जुलै ll

llदिनविशेष ॥

*नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन*

*महत्त्वपूर्ण दिन*

 ↔१९६८ - इंटेल कंपनीकी स्थापनाl
↔१९२५-अडाल्फ हिटलर ने 'माईन काम्फ'यहआत्म चरित्रात्मक पुस्तक का प्रकाशन किया l
 ↔१८५७-मुंबई विद्यापीठ की स्थापना l

*जन्म*
↔१९१८-नेल्सन मंडेला तथा 'मदीबा' ,दक्षिण आफ्रिका के राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक  विजेता l
 ↔१९८२ - प्रियांका चोप्रा, भारतीय अभिनेत्री l

*मृत्यू*

↔१९६९- 'लोकशाहीर' अण्णाभाऊ साठे,लेखक,कवी एवं समाजसुधारक l
 ↔२०१२ - राजेश खन्ना, हिंदी फिल्म अभिनेता l

*संकलक*
*संतोष रहांगडाले गोंदिया*
📱9404277298
✴✴✴✴✴✴✴✴✴✴✴
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿
🌟 *आजका पंचाग*  🌟
   
* *वार* - गुरुवार
* *श्री शालिवाहन शके* - 1941
* *संवत्सर* - विकारीनाम
* *दक्षिणायन*
* *ऋतू* - ग्रीष्म
* *मास* - आषाढ
* *पक्ष* - कृष्ण पक्ष
* *तिथी* - द्वितीया
* *नक्षत्र* - श्रवण

ज्योती वाघमारे, सोलापूर.
(8308479770)
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
➿➿➿➿➿➿➿➿➿➿
 💠  *सुविचार* 💠
     
*जिंदगी खेलती भी उसी के साथ है, जो खिलाड़ी, बेहतरीन होता है.!*

*दर्द सबके एक से है, मगर हौंसले सबके अलग अलग है. कोई हताश हो के बिखर जाता है, तो कोई संघर्ष करके निखर जाता है.*

*”खुश रहिये मुस्कुराते रहिये*😊

*💐शुभ प्रभात*💐
🙏 *आपका दिन शुभ हो*🙏 *दिपक ढास,परभणी*
✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳
➿➿➿➿➿➿➿➿➿➿

💠 *प्रेरणादायी विचार*
 
*"इंसान नहीं बोलता,*
        *उसके दिन बोलते हैं।।*
    *जब दिन नहीं बोलते तो,*
           *इंसान लाख बोले,*
     *उसकी कोई नहीं सुनता।।*
   *नजर  और  नसीब  का  कुछ*
         *ऐसा इत्तेफाक है कि....*   
   *नजर  को अक्सर  वही चीज*
         *पसन्द आती है.......*
  *जो  नसीब  में  नहीं  होती  है* 
         *और............*
   *नसीब    में     लिखी     चीज*   
         *अक्सर नजर नहीं आती....!*
 *अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
 *जि. प.शाळा-माणिकखांब*
 *ता.इगतपुरी, जि.नाशिक*
 *मो.नं.9881856327*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
➿➿➿➿➿➿➿➿➿➿
⭕ *महत्त्वपूर्ण घटनाएं*

🗓🗓🗓🗓🗓🗓🗓🗓🗓🗓🗓
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿
 🌀 *मुहावरे और अर्थ*
✍️✍️✍️✍️✍️✍️

*कहावते और अर्थ*

*अंधों में काना राजा*

*अर्थ – मूर्खों में थोड़ा पढ़ा-लिखा बड़ा विद्वान समझा जाता है|*

*सौ.भारती कुंभार*
*को.ए.सो.वामन गोपाळ गाडगीळ प्राथमिक शाळा महाड*
*जि-रायगड*
9850296824

🌈🌈🌈🌈🌈🌈
♊♊♊♊♊♊♊♊♊♊♊
➿➿➿➿➿➿➿➿➿
   💠 *सामान्यज्ञान*  💠
     
*सामान्यज्ञान प्रश्न*

*(१*) *भारत में सबसे कम जनसंख्या वाला राज्य कौन–सा है ?*
↔ *सिक्किम*

*संकलन -- सुनिता पांडुरंग अनभुले,पाटकर गुरुजी विद्यालय, दादर.*
*९५९४०७३७४४*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
➿➿➿➿➿➿➿➿➿➿

   💠🌟  *पहेली*  🌟

🎯 *पहेली बुझो*🎯

 *मै सबके पास हू |*
 *कोई मुझे खो नहीं सकता |*

🤔 *बुझो तो जाने*🤔

 *उत्तर- परछाई*

 *संकलन*
🎯 *सौ.वर्षा प्रमोद चोपदार* .
भैरव विद्यालय,घाटकोपर
8452920080.

✴✴✴✴✴✴✴✴✴✴✴
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿

💠 *बोधकथा*  💠
   
🎖👈 *जीत किसकी*👉

★★★ बादशाह अकबर जंग में जाने की तैयारी कर रहे थे। फौज पूरी तरह तैयार थी। बादशाह भी अपने घोड़े पर सवार होकर आ गए। साथ में बीरबल भी था। बादशाह ने फौज को जंग के मैदान में कूच करने का निर्देश दिया।

बादशाह आगे-आगे थे, पीछे-पीछे उनकी विशाल फौज चली आ रही थी।
रास्ते में बादशाह को जिज्ञासा हुई और उन्होंने बीरबल से पूछा- क्या तुम बता सकते हो कि जंग में जीत किसकी होगी?

हुजूर, इस सवाल का जवाब तो मैं जंग के बाद ही दूंगा। बीरबल ने कहा।

कुछ देर बाद फौज जंग के मैदान में पहुंच गई। वहां पहुंचकर बीरबल ने कहा- हुजूर, अब मैं आपके सवाल का जवाब देता हूं और जवाब यह है कि जीत आपकी ही होगी।

यह तुम अभी कैसे कह सकते हो, जबकि दुश्मन की फौज भी बहुत विशाल है। बादशाह ने शंका जाहिर की।

हुजूर, दुश्मन हाथी पर सवार हैं और हाथी तो सूंड से मिट्टी अपने ऊपर ही फेंकता है तथा अपनी ही मस्ती में रहता है, जबकि आप घोड़े पर सवार है और घोड़ों को तो गाजी मर्द कहा जाता है। घोड़ा आपको कभी धोखा नहीं देगा।’ बीरबल ने कहा।

उस जंग में जीत बादशाह अकबर की ही हुई।
⚓⚓⚓⚓⚓⚓⚓⚓⚓
✍ *संकलन*✍
श्री.सदाशिव गारळे
Sadashivgarale.blogspot.com
प.रा.विद्यालय भिवंडी,ठाणे
🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿

    💠 *समूहगीत* 💠

🇮🇳 *समूहगान*🇮🇳

जहाँ डाल-डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा
वो भारत देश है मेरा
जहाँ सत्य, अहिंसा और धर्म का पग-पग लगता डेरा
वो भारत देश है मेरा
ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला
जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला
जहाँ सूरज सबसे पहले आ कर डाले अपना फेरा
वो भारत देश है मेरा
अलबेलों की इस धरती के त्योहार भी हैं अलबेले
कहीं दीवाली की जगमग है कहीं हैं होली के मेले
जहाँ राग रंग और हँसी खुशी का चारों ओर है घेरा
वो भारत देश है मेरा
जब आसमान से बातें करते मंदिर और शिवाले
जहाँ किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाले
प्रेम की बंसी जहाँ बजाता है ये शाम सवेरा
वो भारत देश है मेरा

📍 *संकलन- वृषाली खाड्ये,मुंबई*
मो.9967001411

🧱🧱🧱🧱🧱🧱🧱🧱🧱🧱🧱
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿   
💠  *पसायदान* 💠
*आता विश्वात्मकें देवे*

💠 *मौन* 💠

⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🛑 *Editing** *ःसौ.अलका धनकर,वाशिम*
*जि.प.शा.शेलगाव,वाशिम*
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿

©® *🙋🏻‍♀ वृषाली खाडये, मुंबई*
🔸 *पासपोली उ.प्रा. मराठी शाळा क्र.१*
🔸 *आयोजन/ समूह प्रमुख व प्रशासिका*
🔸 मो.9967001411
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿

Tuesday, June 5, 2018

10 Th Result

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. सोमवार (11 जून) रोजी बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल.

सकाळी 11 वाजता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.

कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :

1. www.mahresult.nic.in
2. www.result.mkcl.org
3. www.maharashtraeducation.com
4. www.rediff.com/exams
5. http://maharashtra10.jagranjosh.com

कसा पाहाल निकाल?

दहावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.

समजा तुमचा नंबर P123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात P123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.

Monday, June 4, 2018

दुष्काळी वाळवंट ..प्रदेशातील हा चमत्कार म्हणजे क्यानोत.

|| परिपूर्ण जलव्यवस्थापन ||

आज पासून सुमारे चारशे वर्षांच्या पूर्वीची गोष्ट आहे. मलिक अंबर नावाचा एक हबशी गुलाम होता . त्याला अहमदनगर मधील एका मुस्लीम सरदाराने आफ्रिकेतील गुलामांच्या बाजारात विकत घेतले. नंतर त्या गुलामाच्या अंगभूत गुणांच्या मुळे प्रभावित होऊन त्याने त्याची गुलामीतून मुक्तता केली आणि त्याला आपला सहकारी म्हणून वागवले. तो गुलाम सुद्धा युद्धात उत्कृष्ट कर्तबगारी दाखवत सरदार पदापरेंत चढला. पुढे त्याने औरंगझेबाच्या पदरी नोकरी पत्करली. त्यावेळी औरंगझेब मराठ्यांशी अटकोविटको च्या लढाई साठी महाराष्ट्रात उतरणार होता. त्याला इथे स्थायी स्वरुपाची राजधानी निर्माण करायची होती. त्याच्या सरदार मंडळीनी औरंगाबाद ची निवड केली. औरंगाबाद या गावाचे मूळ नाव खडकी. राजधानी वसवण्याची जबाबदारी मलिक अंबर च्या खांद्यावर येऊन पडली. त्याने ५२ पुरे आणि ५२ दरवाजे असणारे उत्कृष्ट शहर वसवले. शहर वसवताना नागरिकांना पुरेल अश्या पाण्याची सोय करणे भाग होते आणि औरंगाबादेतील खाम नदी त्या दृष्टीने त्या वेळी सुद्धा अपुरी होती.

गुलाम म्हणून आफ्रिकेतून भारतात येताना मलिक अंबर इराण मधून आला होता आणि इराण मधील क्यानोत हि जलव्यवस्थापन यंत्रणा त्याला माहित होती. त्याने त्याच पद्धतीचा येथे अवलंब करायचे ठरवले. इराण देशात सुद्धा पाण्याचे दुर्भिक्ष आहे. परंतु तरी सुद्धा तुम्हाला इराण मध्ये सर्वत्र उत्कृष्ट बागा, कारंजे यांची रेलचेल दिसेल. बऱ्यापैकी दुष्काळी आणि जवळ जवळ वाळवंट असणाऱ्या प्रदेशातील हा चमत्कार म्हणजे क्यानोत.
क्यानोत म्हणजे काय आणि ते कसे बनवले जातात ?

ज्यावेळी पावसाळ्यात पाउस पडतो त्यावेळी डोंगर रंगांच्या मध्ये एक जल साठवण विहीर तयार केली जाते. विहिरीची खोली ५०० फुट किंव्हा त्या पेक्षा अधिक सुद्धा असू शकते अर्थात जमिनीच्या प्रतीनुसार आणि पाण्याची लागणारी गरज यावर विहिरीची खोली ठरते.त्या विहिरीचे तोंड हे शंखाकृती ठेवले जाते ज्यामुळे सूर्यप्रकाश आत पोचू शकत नाही. कोणताही डोंगर अथवा पर्वतीय भागात नैसर्गिकरित्या उंचावर टेबल land तयार झालेली असते. जो डोंगर विहीर तयार करण्यासाठी निवडला जातो त्याच्या पुढे अजून उंच डोंगरांची रांग असल्याची खात्री केली जाते.. त्या डोंगर रांगेवरील पाणी चर खणून या विहिरीपरेंत पोचवले जाते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नाही आणि पाण्यासह धूप झालेली माती विहिरीत येऊ नये म्हणून सभोवताली असणारी डोंगररांग झाडे लावून हिरवीगार केली जाते. झाडे आणि गवत जमिनीची धूप होऊ देत नाही आणि फक्त पाणीच विहिरीपरेंत वाहात येते. या पावसाच्या पाण्याने ती विहीर तुडुंब भरते. आता विहिरीचा परीघ अन खोली हि ज्या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा आहे तेथील दैनंदिन गरज लक्षात घेऊन सुमारे दीड वर्ष ५०० दिवस सलग तितका पाणी पुरवठा होऊ शकेल या पद्धतीने बनवली जाते. या विहिरीत सुद्धा खाली काही भाग हा डेड स्टोक म्हणून असतो ज्यात वाहत आलेल्या पाण्यातील गाळ साठून राहतो आणि फक्त स्वच्ह पाणीच पुढे प्रवाहित होऊ शकते. आता डोंगरापासून खेद्यापरेंत एक सरळ रेषा लक्षात घेऊन प्रत्येकी २०० फुट ( ६० मीटर ) अंतरावर खोल खड्डे ( विहिरी पण कमी परिघाच्या ) तयार केले जातात. आता मुख्य विहीर आणि या छोट्या रांगेतील विहिरी एक मेकांना जोडण्यासाठी आत एक बीळ तयार केले जाते. त्या बिळाच्या वरच्या भागात आर्च म्हणजेच मातीच्या भाजून तयार केलेल्या कमानी बसवल्या जातात. या कमानी मातीचा दाब सहन करतात आणि पाण्यात माती मिसळू देत नाहीत. परंतु पृष्ठभाग मात्र मातीचाच असतो त्यामुळे या बिळातून सुद्धा जमिनीत पाणी झिरपत राहते आणि जमिनीखालील पाण्याचा स्तर सुद्धा राखला जातो. आता हि २०० फुटावर असणारी जी छोटी विहीर आहे तिच्या बरोबर खाली सुद्धा डेड स्टोक तयार करतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी २०० फुट अंतरावर पाण्यातील गाळ साठला जातो आणि पुढे अधिकाधिक शुद्ध पाणी प्रवाहित होत राहते. आता हि यंत्रणा खेड्यापरेंत आली कि त्याचे मुख उघडले जाते. आता मुखाचे तोंड हे साधारण २४ तास पाणी वाहत राहील आणि एका दिवसाची गरज भागेल इतके मोठे असते त्यामुळे वर्षभर त्या खेड्याला पाणी पुरवठा होत राहतो. त्यामुळे तुम्ही खेडे वगळता इराण मध्ये फिरलं तर तुम्हाला वाळवंटच दिसणार पण खेड्यात मात्र मुबलक पाणी वापरासाठी आणि शेतीसाठी पण आणि इतकेच काय मस्त बागा आणि कारंजे सुद्धा. हि अफलातून पद्धत सुमारे ४०० -४५० वर्षापूर्वी सुरु झाली आणि त्या काळात बांधलेले क्यानोत अजून सुद्धा उत्तम काम करत आहेत. नवीन क्यानोत बनवण्याची इराण मध्ये गरज पडत नाही फक्त जे आहेत त्या क्यानोत ची देखभाल केली जाते. डोंगरातील पाणी सायफन च्या तत्वाने खेड्यात येते वर्षभर पुरते. वीज किंव्हा कशाची सुद्धा गरज नाही.

मलिक अंबर ने हेच तंत्रज्ञान वापरून औरंगाबाद जवळ असणाऱ्या जटवाडा च्या डोंगर रांगातून पाणी आणले अंतर सुमारे ३० किलोमीटर. आणि त्या पाण्याचा पहिला स्त्रोत बेगमपुरा येथे उघडला. त्या पाण्यावर चालणारी पाणचक्की हे एक पर्यटन स्थळ म्हणून औरंगाबाद ला गेलेल्या प्रत्येकाला माहित आहे. या प्रकल्पावर चीफ इंजिनियर ( त्या काळी ) थत्ते म्हणून गृहस्थ होते. त्यांनी त्यांच्या वाड्यात सुद्धा यातील एक लाईन ओढून घेतली. बेगमपुर्यात पाण्याने सतत भरला राहणारा थत्ते हौद सुद्धा तितकाच प्रसिद्ध. हि नहरे अंबरी एकेकाळी सुमारे ४० % औरंगाबाद ला पाणी पुरवत असे ( १९९० परेंत ) परंतु गेल्या काही वर्षात हिची काळजी न घेतल्याने पार वाट लागली आहे आणि मी मध्ये औरंगाबाद ला गेलो त्यावेळी थत्ते हौद कोरडा पडला होता. पाणचक्कीमध्ये तरी सध्या पाणी आहे. किती काल टिकेल माहित नाही. आपण न बांधलेल्या धरणांच्या साठी ७०००० कोटी खर्च करू शकतो पण या अभियांत्रिकी चमत्काराला जिवंत ठेवण्यासाठी आणि सतत पाणी मिळवण्यासाठी काही लाख रुपये दर वर्षी देखभाल दुरुस्तीला खर्च करू शकत नाही हे लज्जास्पद आहे. पैठण ते औरंगाबाद जलवाहिनी बनवली आहे तिच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च झाले. पाणी उपसा करून आणायला कोट्यावधी रुपयाची वीज लागते पण हे फुकट तंत्रज्ञान मात्र आपण वापरत नाहीत. ती जलवाहिनी वर्षातून कमीत कमी दोन वेळेला फुटते आणि आणि औरंगाबाद ला निर्जळी घडते क्यानोत ४०० वर्षांच्या पूर्वी बांधली आज सुद्धा फुकटात काम करते. पण अक्कल शून्य असणारा सिंचन विभाग आणि प्रेताच्या टाळूवरील लोणी चाटत जगणारे पुरातत्व खाते या अनमोल ठेव्याला नष्ट होताना पाहत बसले आहेत. दुर्दैवाने सामान्य माणूस तर निसर्गापासून कायमचा तुटला आहे त्याला या अनमोल ठेव्याची काहीच किंमत नाही.

या पद्धतीच्या यंत्रणा तुम्हाला भारतात सुद्धा इतर ठिकाणी बघायला मिळतील. तुळजापूर ला मंदिरात जाताना गोमुखातून पडणारे पाणी, राजापूर ची प्रकट होणारी आणि गायब होणारी गंगा. लोणार च्या खार्या पाण्याच्या सरोवराजवळील मंदिरातील सतत वाहणारी गोड्या पाण्याची धार. हेच तंत्रज्ञान फक्त विहिरीपरेंत तुम्हाला प्रत्येक लेणी मध्ये वापरलेले दिसेल. हेच तंत्रज्ञान तुम्हाला प्रत्येक किल्ल्यावर सुद्धा विहिरीच्या स्वरूपात वापरलेले दिसेल. त्याला टाके म्हणतात.

वर्षभर फुकट मिळणारे पाणी. पाउस पडताना साठवून ठेवायचे. किती साधे आणि सोपे निसर्गपूरक तंत्रज्ञान.परंतु आजच्या काळात आपण प्रगत झालो आहोत. आपण डोंगर फोडतो.. जंगले उध्वस्त करतो आणि पावसाचे पाणी वाहून जाऊ देतो. नंतर आपण डोंगराळ भागाला नोवेंबर ते जून tanker ने पाणी पुरवठा करतो. पैसे खर्च झाले तरी चालतील पण ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची करियर tanker ने पाणी पुरवठा होऊन घडणे अधिक महत्वाचे आहे.

क्यानोत म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी मी या लेखासोबत काही फोटो टाकतो आहे त्यामुळे अधिक योग्य पद्धतीने लक्षात येईल. इराण मध्ये उन्हाळ्यात लोकांना बाहेर पडणे अशक्य होते. क्यानोत या यंत्रणेचा वापर करून इराण मध्ये त्यांनी खेड्यातील लोकांना दुपारी आराम करण्यासाठी नैसर्गिक रित्या थंड असणाऱ्या खोल्या सुद्धा तयार केलेल्या आहेत त्याचे फोटो सुद्धा या लेखासोबत देतो आहे. जरूर पहा....

Monday, June 12, 2017

सातवा वेतन आयोग लागू करा, अन्यथा संप, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा http://tz.ucweb.com/6_14Q1g

दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार! http://tz.ucweb.com/6_110WZ